हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फेडरल बँक आणि पंजाब नॅशनल बँकेकडून आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. PNB ने आता एक वर्ष ते तीन वर्षे, पाच वर्षे किंवा त्याहून जास्त आणि दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
तसेच फेडरल बँकेकडून आता 7 दिवस ते 75 आठवड्यांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 3 टक्के ते 5.75 टक्के तर ज्येष्ठ ग्राहकांना 3.50 ते 6.40 टक्के व्याज दिले जाईल. हे लक्षात घ्या कि, 17 ऑगस्टपासून या दोन्ही बँकांचे नवे व्याजदर लागू झाले आहेत. Bank FD
PNB चे नवीन व्याजदर जाणून घ्या
एका मीडिया रिपोर्टनुसार, PNB आता एका वर्ष कालावधीच्या FD वर वार्षिक 5.50 टक्के दराने व्याज देणार आहे. तसेच एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या FD वरील व्याजदर 5.50 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, बँकेकडून आता दोन आणि तीन वर्षांच्या FD वर 5.60 टक्के व्याज दिले जाईल. Bank FD
मात्र PNB कडून तीन ते पाच वर्षांच्या एफडीवर आधीप्रमाणेच 5.75 टक्के व्याज दिले जाईल. PNB कडून आता पाच वर्षे ते दहा वर्षांच्या कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.65 टक्के केला गेला आहे. 2 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेस पॉईंट्स दिले जातील. म्हणजेच त्यांना 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल. Bank FD
फेडरल बँकेकडूनही जास्त व्याज मिळणार
फेडरल बँक आता 7 दिवस ते 29 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 30 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के आणि 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के व्याज देईल. त्याचप्रमाणे, आता 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के, 91 ते 119 दिवसांच्या एफडीवर 4.10 टक्के आणि 120 ते 180 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.25 टक्के व्याज देईल. Bank FD
त्याचप्रमाणे, बँक 181 ते 332 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 4.80 टक्के आणि 333 दिवसांच्या एफडीवर 5.45 टक्के व्याज देईल. त्याच ग्राहकांना बरोबर आता 334 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.80 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे एका वर्षात पूर्ण झालेल्या एफडीवर आता 5.45 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे, आता 20 महिन्यांत पूर्ण झालेल्या एफडीवर 5.90 टक्के व्याज दिले जाईल. Bank FD
7.45 टक्के व्याज मिळेल
फेडरल बँकेने आता 20 महिन्यांपासून ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FDवर 5.60 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँक आता 2 वर्षे ते 749 दिवसांच्या FD वर 7.45 टक्के व्याज देईल. 750 दिवसांच्या FD वर 6.10 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे, बँकेने 75 महिन्यांच्या एफडीवर 6.10 टक्के आणि 75 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.federalbank.co.in/deposit-rate
हे पण वाचा :
Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!
Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च
Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!
FD Rates : सणासुदीच्या हंगामात ‘या’ बँकांकडून FD वर दिली जात आहे खास ऑफर !!!