हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : कोविड-19 महामारीच्या काळात भारतातील अनेक बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्यतिरिक्त व्याजाचा लाभ देण्यासाठी असे केले गेले होते.
मात्र, आता काही बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या FD योजना बंद केल्या जाणार आहेत. हे लक्षात घ्या कि, या स्पेशल एफडी योजनेंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना स्टॅण्डर्ड व्याज दरापेक्षा 50 बेसिस पॉइंट्स जास्त व्याजदर मिळतो. Bank FD
SBI ‘Wecare Deposit’
SBI कडून Wecare सीनियर सिटीजन टर्म डिपॉझिट स्कीमच्या व्हॅलिडिटीचा कालावधी पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी डिपॉझिट्सवर 30 बेस पॉइंट अतिरिक्त व्याज दिले जाते. तसेच पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या डिपॉझिट्सवर देखील सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज दिले जाईल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर 0.80 टक्के (0.50 +0.30) जास्त व्याज मिळेल. Bank FD
HDFC Senior Citizen Care
एचडीएफसी बँकेकडून सीनियर सिटीजन केअर सुरू करण्यात आली. आता याबाबत बँकेने म्हटले आहे की, या वर्षी 30 सप्टेंबर हा त्यांच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स योजनांसाठी शेवटचा दिवस असेल. बँकेकडून या डिपॉझिट्स वर 0.75 टक्के जास्त व्याज मिळते. Bank FD
ICICI Bank Golden Years
ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ICICI बँक गोल्डन इअर्स योजना लाँच केली आहे. या योजनेसाठी बँकेकडून 0.80 टक्के जास्त व्याज दिले जात आहे. तसेच 07 ऑक्टोबर 2022 पर्यंतच या योजनेचा लाभ घेता येईल. Bank FD
IDBI Bank (Naman Senior Citizen Deposit)
20 एप्रिल 2022 रोजी IDBI बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल IDBI नमन ज्येष्ठ नागरिक डिपॉझिट्स कार्यक्रम लाँच केला. IDBI बँकेने म्हटले आहे की,” या वर्षी 30 सप्टेंबर हा त्यांच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स योजनांसाठी शेवटचा दिवस असेल. या योजनेमध्ये सध्याच्या 0.50 टक्के वार्षिक दराव्यतिरिक्त 0.25 टक्के अतिरिक्त व्याज दर मिळेल.” Bank FD
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.idbibank.in/naman-senior-citizen-deposits.aspx
हे पण वाचा :
Saving Account बंद करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान
Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का??? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
Multibagger Stocks : ‘या’ 3 केमिकल कंपन्यांच्या शेअर्सनी दिला 800% रिटर्न !!!
Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये