नवी दिल्ली । बचत करण्यासाठी बँकेची FD हा पहिला पर्याय आहे, कारण हा गुंतवणूकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) करण्याची योजना आखत असाल तर सर्व बँकांच्या व्याजदराबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. तर आज आम्ही आपल्याला अशाच काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
छोट्या खाजगी बँकांनी एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याज दर 50 बीपीएसवरून 25 बीपीएसवर आणले आहेत. RBL बँकेने एक वर्षाच्या FD वरील व्याज दर आधीच्या 6.5 टक्क्यांवरून 6.10 टक्क्यांवर आणले आहेत. त्याचप्रमाणे IndusInd बॅंकेने एक वर्षाच्या FD वरील व्याज दर 6.5 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणला आहे. परंतु असे असूनही ही बँक एका वर्षाच्या FD ला जास्त रिटर्न देते.
बॅंकांच्या अलिकडच्या व्याजदराच्या कल आणि रिटर्न वर नजर टाकल्यास यामध्ये लहान बँका अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते. FD वर व्याज देण्याच्या बाबतीत लहान बँका अधिक योग्य आहेत.
RBL Bank: आरबीएल बँक 6.10% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.6% व्याज मिळणार आहे.
IndusInd Bank: इंडसइंड बँक 6% व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.5% पर्यंत व्याज मिळत आहे.
Yes Bank: येस बँक ग्राहकांना 6% व्याज मिळू शकेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.5% व्याज मिळेल.
Suryoday Small Finance Bank: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 6.75 टक्के व्याज देत आहे.
Ujjivan Small Finance Bank: उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या FD वर 6.50 टक्के व्याज देते.
परदेशी बँकांमध्ये, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीबीएस बँक ऑफर केलेले व्याज दर एक वर्षाच्या FD वर 5.30 टक्के आणि 4.25 टक्के आहेत.
ICICI and HDFC: आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या प्रमुख खाजगी बँका एक वर्षाच्या FD वर 4.90 टक्के व्याज देतात.
Axis Bank: याशिवाय अॅक्सिस बँक 5.15 टक्के व्याज देत आहे.
Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या FD वर 4.50 टक्के व्याज देते जो सर्व खासगी बँकांमधील सर्वात कमी दर आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा