हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IDBI बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या सुविधा ऑफर करत असते. आता याच बँकेने आपल्या ग्राहकांसाठी FD योजना ऑफर केली आहे. ज्यामध्ये अल्पकाळामध्ये तब्बल 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. IDBI बँकेची ही ऑफर 30 जून 2024 पर्यंत त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू असणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यांनी त्वरित बँकेची संपर्क साधावा.
IDBI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा कालावधी 300 दिवसांचा आहे. 300 दिवसांच्या या विशेष FD योजनेवर ग्राहकांना 7.05 टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज दिले जात आहे. यासह 444 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर बँक सामान्य ग्राहकांना 7.20 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे. या योजनेची अंतिम मुदत 30 जून 2024 रोजी संपत आहे. परंतु तुम्हाला जर मुदत पूर्व पैसे काढायचे असतील तर त्यासाठी दंड भरावा लागेल.
महत्वाचे म्हणजे IDBI बँकेसह इंडियन बँकेनेही आपल्या ग्राहकांसाठी 300 आणि 400 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहकांना 7.05 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर दिले जात आहे. यासह 400 दिवसांच्या विशेष FD योजनेवर बँक सामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के, 7.75 टक्के आणि 8 टक्के व्याज देत आहे. या योजनेची ही अंतिम मुदत 30 जून आहे.
दरम्यान, पंजाब आणि सिंध बँकेने देखील 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडी योजना आणली आहेत. या बँक ग्राहकांना 222 दिवसांच्या FD योजनेवर 7.05 टक्के व्याजदर, 333 दिवसांच्या FD योजनेवर 7.10 टक्के व्याजदर आणि 444 दिवसांच्या विशेष FD योजनेवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे.