हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी राहण्यासाठी हाडे मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे वय वाढत असताना आपली हाडे निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत आपली दैनंदिन जीवनशैलीही निरोगी असायला हवी. यापूर्वीच्या काळात वाढत्या वयासोबत हाडे दुखण्याचा त्रास होत होता परंतु अलीकडच्या काळात तरुण मुलांनाही या समस्येला सामोरं जावं लागतंय. यासाठी आपल्याच चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. चला आज आपण जाणून घेऊया अशा कोणकोणत्या सवयी आहेत ज्यामुळे हाडांना नुकसान होण्याची शक्यता असते.
जास्तीचे प्रोटीन खाणे –
खरं तर स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीर चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे मानले जाते, परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेववन केलं तर मात्र हाडांचे नुकसान देखील होऊ शकते. जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्यास शरीराला कॅल्शियम जास्त प्रमाणात उत्सर्जित करावे लागते, ज्यामुळे हाडांना आवश्यक खनिज पुरेशा प्रमाणात मिळत नाही. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात.
जास्त मीठ खाणं –
सोडियम शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. मीठामध्ये भरपूर सोडियम असते, परंतु जास्त मीठ खाल्ल्याने हाडे कमकुवत होतात. त्यामुळे मिठाचे जास्त सेवन करू नका.
धूम्रपान-
धूम्रपान करणे ही सर्वात वाईट सवय आहे. धूम्रपानामुळे फक्त तुमच्या फुफ्फुसांचे नुकसान होत नाही तर धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या हाडांवरही त्याचा परिणाम होतो. आणि त्याच्या चालण्याच्या आणि कामाच्या क्षमतेवर परिणाम होतो.
एकाच जागी बसणे –
काही लोक तासनतास एकाच जागी बसतात. परंतु असे केल्याने आपल्या हाडांचे नुकसान होऊ शकते. हाडे व्यावस्थित आणि निरोगी राहण्यासाठी हाडांची हालचाल आवश्यक आहे. त्यामुळे जास्त वेळ एकाच जागी बसू नका.