डोळे येणे म्हणजे नेमके काय? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती 5 उपाय

Eye flu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे परिसरात आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात “डोळे येणे” या आजाराने थैमान घातले आहे. आळंदीमध्ये तर ३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यात डोळ्यांच्या साथीमुळे चिंता वाढली आहे. यासाथीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय आणि त्याविषयीची माहिती देणार आहोत. डोळे येणे याला दुसरा शब्द आय फ्लू असा आहे. अशा संसर्गाला डोळे लाल होणे, पिंक आय, कंजंक्टिवायटिस असे ही म्हणले जाते. पावसाळ्याच्या वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपल्याला सतत घाम येतो. हा घाम पुसत असताना आपला हात वारंवार डोळ्यांना देखील लागत असतो यामुळेच संसर्ग होतो आणि डोळे येतात.

डोळे येण्याची लक्षणे कोणती?

डोळे येण्यापूर्वी आपले डोळे हलकेसे लाल दिसू लागतात. सतत डोळ्यांवर तणाव येऊन त्यातून पाणी यायला लागते. डोळ्यांच्या हातून खाज सुटल्यासारखी वाटते तसेच टोचल्या सारखे देखील होते. डोळ्यात थोडा चिकटपणा जाणवतो. आपल्याला सतत डोळा चोळू वाटतो. काहीवेळा या संसर्ग मध्ये सर्दी, खोकला, ताप अशीही लक्षणे दिसून येतात. यातूनच आपल्याला डोळे येणार असल्याचे समजते.

या आजारावरील उपाय कोणते?

1. मध

डोळे आल्यानंतर त्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. काळजी न घेतल्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे मध डोळ्यांसाठी आरामदायी आणि फायदेशीर ठरते. मधाच्या पाण्याने डोळे पुसल्यानंतर डोळ्यांमधील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच डोळ्यातील जंतू मरून वेदना देखील कमी होतात. मधामध्ये इतर गुणधर्म असल्यामुळे देखील डोळ्यांसाठी मध फायदेशीर असते.

2. गुलाबपाणी

डोळे येण्याच्या संसर्गापासून सुटका मिळवण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा वापर करू शकतो. डोळे आल्यानंतर त्यावर गुलाबपाणी लावल्याने डोळे येण्याचा आजार लवकर बरा होतो. गुलाब पाणी डोळ्यांना थंडावा देते तसेच डोळ्यांमध्ये होणारी जळजळ थांबवण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. डोळ्यांच्या आत साठलेली घाण देखील गुलाबपाणी लावल्याने बाहेर येते. रोज एका कॉटनच्या फडक्याने गुलाब पाणी घेऊन डोळे पुसल्याने हा आजार बरा होऊ शकतो.

3. बटाटा

बटाटा हा अनेक कारणांसाठी आरोग्यदायी ठरतो. त्याचबरोबर बटाटा आपण डोळे येण्याचा त्रास बरा करण्यासाठी ही वापरू शकतो. बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. बटाट्याचे गोल काप करून डोळ्यांवर ठेवल्यानंतर आपल्याला त्याचा आराम मिळू शकतो. डोळ्यांना थंडावा देण्याचे काम बटाटा करतो.

4. तुळशी

तुळशी आणि एक आजारांवरील रामबाण उपाय आहे. डोळे आल्यानंतर तुळशीची माती डोळ्यांना लावण्याचा देखील सल्ला अनेकांकडून दिला जातो. मात्र तसे न करता तुळशीचा रस जरी डोळ्यांना लावला तरी त्याचा आपल्याला फायदा दिसून येतो. यासाठी तुळशीची पाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर ते तुळशीचे पाणी गाळून त्याने तुमचे डोळे धुवा. यातून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

5. हळद

डोळे येणे या आजारावर सुटका मिळवण्यासाठी हळदीचा वापर नक्की करा. आयुर्वेदिक हळद डोळ्यांना बरे करण्यास मदत करते. तसेच यामुळे आलेले डोळे देखील जातात. यासाठी, अर्धा चमचा हळद कोमट पाण्यामध्ये मिसळा. यानंतर ही हळद डोळ्यांना लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये सर्व घाण निघून जाईल. तसेच डोळ्यांच्या वेदना कमी होऊन त्यावर आराम मिळेल.