संतपीठ ते सौरऊर्जा…; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक दिवसांपासून संतपीठाची मागणी होती. आता मुख्यमंत्र्यांनीच या संतपीठाची घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. तसंच, घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे वेगळ्या प्रकारे बांधकाम करतोय असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.

निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं . निजामशाहीच्या काही खुणा आहेत, त्या आता जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातल्या सुमारे 150 शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या-

निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार

मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा

औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून

औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना

सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये

औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार

परभणीत शासकीय महाविद्यालय