हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। उडदाच्या डाळीच्या भाज्या आणि त्याचे पदार्थ हे शरीरासाठी जास्त फायदेशीर असते. बरेच लोक वरण बनवण्यासाठी उडीद डाळ देखील वापरतात. गावाकडील लोक उडदाच्या डाळीचे घुट केलं जातं. ते खाण्यासाठी आणि शारीराच्या पोषक वाढीसाठी महत्वचे आहे. या डाळीचा वापर खाण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. दोन्ही मार्गांचा वापर करताना ते तितकेच फायदेशीर आहे. उडदाचा वापर तुम्हाला असंख्य आरोग्य लाभ देते. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे नुकसानही होऊ शकतात. जाणून घेऊया अतिसेवनाचे नुकसान…
जास्त प्रमाणात काळी उडीद डाळ सेवन केल्याने सर्वात मोठा धोका म्हणजे तो तुमच्या रक्तात यूरिक एसिडचे प्रमाण वाढते. परिणामी, ते मूत्रपिंडातील मुतखडाचू समस्या निर्माण करू शकते. मुतखडा पीडित लोकांनी उडदाची डाळ अगदी थोड्या प्रमाणात वापरली पाहिजे. त्याचा त्रास लहान वयातील मुलाना सुद्धा होऊ शकतो.
जास्त उडीद डाळ खाल्ल्यास तुम्हाला अपचनाची समस्या उद्भवू शकते. उडदाच्या अतिसेवनामुळे बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. त्याचा प्रभाव व्यक्तीनुसार बदलू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रतिकूल परिणामाचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’