हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, Kotak Mahindra Bank ने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे.
24 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
बँकेच्या वेबसाइटनुसार, 24 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. हे व्याजदर नवीन तसेच सध्याच्या FD वर लागू होतील. त्याच प्रमाणे कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना आता किमान एकरकमी 5000 रुपयांच्या डिपॉझिट्स द्वारे एफडी खाते उघडता येईल. Bank FD
Kotak FD Bank च्या एफडीचे व्याज दर तपासा (Bank FD)
7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के
15 ते 30 दिवसांच्या FD वर 3 टक्के
31 ते 45 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के
46 ते 90 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के
91 ते 120 दिवसांच्या FD वर 4 टक्के
121 ते 179 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के
180 दिवस ते 363 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के
364 दिवसांच्या FD वर 6.00 टक्के
365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर 6.75 टक्के
390 दिवस (12 महिने 25 दिवस) ते 23 महिने 1 दिवस – 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के
दोन ते तीन वर्षाच्या FD वर 6.75 टक्के
तीन वर्षे किंवा त्याहून जास्त मात्र चार वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के
4 वर्षे किंवा त्याहून जास्त मात्र 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25 टक्के
5 वर्षे किंवा त्याहून जास्त मात्र 10 वर्षांचा समावेश नसलेल्या FD वर 6.20 टक्के
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit.html
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये