हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपुर्ण राज्यात नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. या काळात भाविकांची दुर्गा देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र भाविकांना हे देखील माहीत असायला हवे की, आपल्या देशात दुर्गा देवीची अशी काही मंदिरे आहेत जी विशिष्ट कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याच मंदिरांविषयी माहिती देणार आहोत. जिथे तुम्हाला देखील भेट देण्याची इच्छा होईल. (Famous Temples to Visit)
1) ज्वाला देवी मंदिर –
ज्वाला देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर डोंगर भागातमध्ये आहे. ज्वाला देवी तीर्थक्षेत्र 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. असे म्हणतात की, या देवीची जीभ अग्नीच्या ज्वालासारखी आहे. त्यामुळे तिला ज्वाला देवी असे म्हणतात. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक जगभरातून हिमाचल प्रदेशात जात असतात.
2) करणी माता मंदिर –
राजस्थानच्या बिकानेरपासून 30 किमी अंतरावर जोधपूर रोडवरील देशनोक गावाच्या हद्दीत करणी माता मंदिर आहे. हे मंदिर उंदीर मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात उंदरांची पूजा केली जाते. तुम्ही जर या मंदिराला भेट देण्यासाठी गेला तर तुम्हाला संपूर्ण मंदिरामध्ये उंदीर दिसून येतील. अनेक भक्त लोक तरी या मंदिरात फक्त उंदरांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.
3) दक्षिणेश्वर काली मंदिर
दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकातामधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम 1847 मध्ये करण्यात आले होते. हे मंदिर 25 एकरमध्ये परिसरात आहे. या मंदिरामध्ये दक्षिणेश्वर मातेची मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून जातात, दक्षिणेश्वर काली लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना आशीर्वाद देते अशी येथील लोकांची मान्यता आहे.
4) श्रीसंगी कालिका मंदिर
श्रीसंगी कालिका मंदिर देवी कलिलाला समर्पित मंदीर आहे. हे मंदीर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.येथे दुर्गा देवीच्या काळ्या रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद श्रीसंगी कालिका देवी देते, असा विश्वास स्थानिक व्यक्त करतात. त्यामुळे अनेक जण या मंदिराला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून जात असतात.
5) दंतेश्वरी मंदिर
दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. सुंदर लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप जुने आहे. असे म्हणतात की, याठिकाणी सतीचा दात पडला होता. त्यामुळे या परिसरात दंतेश्वरी मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर त्याच्या कलाकृतीमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे.