हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या घरफोडयाच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाल्याने अखेर त्याने मोठया चोरीचा बेत रद्द केला. टोपी पाहिल्यानंतर हे लष्करी अधिकाऱ्याचे घर असल्याचे माझ्या लक्षात आले. मला हे आधी माहित असते तर, मी इथे घरफोडी केली नसती. ऑफीसर मला माफ करा” असे भिंतीवरील संदेशात लिहिले आणि हा दरोडेखोर पसार झाला.
केरळच्या कोच्ची शहरातील तिरुवानकुलममध्ये ही अजब घटना घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून आत शिरल्यानंतर आपण निवृत्त कर्नलच्या घरात आलो आहोत, हे चोराच्या लक्षात आले. अचानक त्याच्या मनात देशभक्तीची भावना प्रखर झाली. त्याने मोठया मुद्देमालाची चोरी न करता भिंतीवर बायबलमधील एक संदेश लिहिला व तिथून निघून गेला.
या चोरट्याने घरातून बाहेर पडताना हा चोर फक्त १५०० रुपये, एक ड्रेस आणि लष्करी दारुची बाटली सोबत घेऊन गेला व भिंतीवर माफीनामा सुद्धा लिहिला. या कर्नलच्याच घराच्या बाजूला असलेल्या एका दुकानातून त्याने कागदपत्रांनी भरलेली एक बॅग चोरली होती. ती बॅगही तिथेच सोडली होती.