हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरपे (ता. कराड) येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठावरील ट्रान्स्फार्मरमधील ऑईल आणि साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ट्रान्स्फार्मरमधील साहित्याच्या चोरीमुळे येथील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरपे ता. कराड येथील दौलतनगर वस्ती परिसरात कोयना नदीकाठी अनेक ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील एक ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरटयांनी पोलवरून खाली उतरविला आणि त्याच्यातील ऑईलसह इतर तांब्याच्या तारा व इतर साहित्य काढून नेले.
या घटनेनंतर येथील विदुत पुरवठा खंडित झाल्याने गावातील शेतकरी शेतकरी विजय देवकर, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब देवकर, धनेशवर देवकर, शंकर देवकर, तानाजी देवकर यांनी नदीकाठी असलेल्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी केली असता त्यांच्या हि निदर्शानास आली. त्यांनी तात्काळ याची माहिती वीज वितरण महामंडळातील अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पंचनामा करतो असे सांगितले.
कोयना नदीकावरील MSEB च्या ट्रान्स्फार्मरवर चोरट्यांचा डल्ला; मध्यरात्रीची घटना pic.twitter.com/fjR0aGs1iM
— santosh gurav (@santosh29590931) January 22, 2023
यापूर्वीही येरवळे, किरपे, एनके हद्दीतील वांग नदी काठावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्याची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांकडून संबंधित विभागांना माहितीही देण्यात आली. त्यावेळी विभागाने पंचनामा करून पंचनामा करत पुन्हा नव्याने दुरुस्ती केली. तसेच पुन्हा नव्याने ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य बसवले.आता पुन्हा किरपे गाव परिसरात कोयना नदीकाठावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा हा वारंवार खंडित होत असून शेतकर्याना पिकांना पाणी देणे मुश्किल बनले आहे.