हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks : गुंतवणूक करण्याच्या अनेक पर्यायांमध्ये शेअर बाजार देखील एक आहे. याद्वारे लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावता येतील. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये Penny Stocks बाबत अनेकदा चर्चा होत असते. 10 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या शेअर्सना पेनी स्टॉक असे म्हंटले जाते. पेनी स्टॉकच्या कमी किंमती या गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षित करतात. यातील काही कंपन्यांच्या शेअर्सची किंमत तर एक रुपयापेक्षा कमी असते. मात्र इथे हे ध्यानात घ्या कि, हे शेअर्स मोठा नफा मिळवून देत असले तरीही यातील काही शेअर्स मोठे नुकसान देखील करतात. याद्वारे अनेक गुंतवणूकदारांना आपले भांडवल देखील गमवावे लागले आहे.
Penny Stocks कंपन्या लहान आहेत. या कंपन्यांची मार्केट कॅप कमी असते. सामान्यतः 500 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्यांना तज्ञ या श्रेणीत ठेवतात. त्यांच्याबाबतची माहिती गोळा करणे खूपच अवघड असते. कोणत्याही माहितीशिवाय अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवणे हे धोक्याचे ठरेल.
स्टॉक किमतीत फेरफार
या शेअर्समध्ये लिक्विडीटी खूपच कमी असते. म्हणजेच बाजारात ट्रेडिंगसाठी मर्यादित शेअर्सच उपलब्ध असतात. पेनी स्टॉक कंपन्यांची कमी मार्केट कॅप आणि कमी लिक्विडीटीमुळे त्याच्या किंमतींत फेरफार करणे सोपे असते.
ऑपरेटर खेळतात
हे जाणून घ्या कि, अशा शेअर्समध्ये ऑपरेटर कमी किंमतींमध्ये जास्त शेअर्स खरेदी करतात, यामुळे त्या शेअर्सची किंमत झपाट्याने वाढू लागते. ज्यामुळे लोकांना वाटते की, या शेअर्सचे मूल्य वाढत आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे त्याची किंमत चुकीच्या पद्धतीने वाढवली जात असते. अशा प्रकारे Penny Stocks ऑपरेट केले जास्त असल्याने त्यामध्ये जोखीम देखील वाढते. तसेच किंमत वाढल्यानंतर ऑपरेटर शेअर्सची विक्री करतात. त्यामुळे शेअरचे भाव घसरायला लागतात. लोअर सर्किटमुळे त्यात अडकलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्सची विक्रीही करता येत नाही.
रिसर्च करणे महत्वाचे
कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबाबतची माहिती गोळा करा. या कंपन्या खूपच लहान असतात. ज्यामुळे त्यांच्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नसते. त्याच प्रमाणे कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी जाणून घेऊनच यामध्ये गुंतवणूक करा.
एकाच वेळी खूप पैसे गुंतवणे टाळा
Penny Stocks मध्ये एकाच वेळी खूप पैसे गुंतवू नका. यामध्ये आपल्याला परवडेल तितकेच पैसे गुंतवा, कारण पेनी स्टॉक जास्त जोखमीचे असतात. पेनी स्टॉकच्या किंमती कधीही स्थिर नसतात, त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी मार्केटची माहिती घ्या. मार्केट समजून घेण्यासाठी एखाद्या तज्ञाचे मत जाणून घ्या.
नफा मिळाल्यास बाहेर पडा
Penny Stocks मध्ये जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करू नका. या शेअर्सच्या किंमती जितक्या झपाट्याने वाढतात तितक्याच वेगाने घसरतातही. चांगला नफा मिळाल्यानंतर शेअर्सची विक्री करा. आज इंटरनेटवर सर्व माहिती उपलब्ध असते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नव्हे तर नीट तपासून आणि समजून घेतल्यानंतरच गुंतवणूक करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://indiancompanies.in/list-of-penny-stocks-in-india
हे पण वाचा :
SBI ने सुरू केली नवीन एफडी स्कीम, जाणून घ्या ‘या’ योजनेशी संबंधित खास गोष्टी
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Vivo Y100 : Vivo ने लाँच केला रंग बदलणारा फोन !!! असे असतील किंमत अन् फीचर्स