हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदार अनेकदा पेनी स्टॉक विषयी चर्चा करतात. अनेक गुंतवणूकदार मोठा नफा कमावण्यासाठ पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करततात. पेनी स्टॉकद्वारे अल्पावधीत श्रीमंत होता येते असाही एक समज अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मात्र हे वाटते तितके सोपे नाही. पेनी स्टॉक्सच्या नादी लागून गुंतवणूकदारांनी आपले पैसे गमावल्याची अनेक उदाहरणे पाहता येतील.
आता तुम्ही म्हणाल कि, हे Penny Stocks काय असतात… तर हे असे शेअर्स असतात ज्यांची किंमत 10 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असते. तसेच या कंपनीची मार्केटकॅपही कमी असते. 500 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅप असलेल्यांना या पेनी स्टॉक कॅटेगिरीमध्ये गणले जाते. इथे हे लक्षात घ्या कि, पेनी स्टॉकशी संबंधित कंपन्या लहान असतात. ज्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती गोळा करणे खूप अवघड असते. त्यामुळे कोणत्याही अपुऱ्या माहितीच्या आधारे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे ठरेल.
शेअरच्या किंमतीत फेरफार
बाजारात Penny Stocks च्या ट्रेडिंगसाठी मर्यादित शेअर्सच उपलब्ध असतात. मार्केटकॅप आणि लिक्वीडिटी कमी असल्यामुळे त्यांच्या कींमतीत फेरफार करणेही सोपे असते.
ऑपरेटरकडून गडबड केली जाते
Penny Stocks मध्ये गुंतवणूकदार कधी कधी फसवणुकीला बळी पडतात. कारण ऑपरेटर कमी किंमतीत जास्त शेअर्सची खरेदी करतात, ज्यामुळे शेअर्सची किंमत वाढू लागते. आणि किरकोळ गुंतवणूकदार शेअरचे वाढलेले भाव पाहून ते खरेदी करतात. यानंतर आणखी किंमत वाढल्यानंतर ऑपरेटर आपले शेअर्स विकतात. त्यामुळे शेअरचे भाव घसरतात. अशातच लोअर सर्किटमुळे त्यात अडकलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सची विक्री करता येत नाही.
रिसर्च करणे महत्वाचे
कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्या कंपनीबाबत चांगला रिसर्च करा. या कंपन्या खूपच लहान असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसते. त्याचबरोबर कंपनीची भविष्यातील वाढ, उत्पादन, कामगिरी आणि पार्श्वभूमी जाणून घेऊनच शेअर्स खरेदी करा.
एकाच वेळी जास्त पैसे गुंतवू नका
एकाच वेळी जास्त पैसे गुंतवू नका. जर पेनी स्टॉक बुडाला तर आपल्याला जितके नुकसान सहन होईल तेवढीच गुंतवणूक करा, कारण Penny Stocks मध्ये जास्त जोखीम असते. हे जाणून घ्या कि, पेनी स्टॉकच्या किंमती फार स्थिर नसतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट नीट समजून घ्या. त्यासाठी एखाद्या तज्ञाची मदत घेता येऊ शकेल.
नफा मिळत असेल तर काढून घ्या
Penny Stocks मध्ये दीर्घ काळासाठी कधीही गुंतवणूक करू नका. त्या शेअर्सची किंमत ज्या वेगाने वाढते त्याच वेगाने घसरतेही. त्यामुळे असे शेअर्स खरेदी केल्यावर चांगला नफा मिळाल्यावर लवकरात लवकर विकून टाका. आज इंटरनेटवर याविषयीची भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. सखोल अभ्यास करून आणि समजून घेतल्यानंतरच गुंतवणूक करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://indiancompanies.in/list-of-penny-stocks-in-india-2021/
हे पण वाचा :
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!
James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!
ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ
Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा