भाजप-काँग्रेसविना देशात तिसरी आघाडी स्थापन होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | दाक्षिणात्य क्षेत्रातील प्रादेशिक पक्षांना हाताशी धरुन देशात काँग्रेस आणि भाजपविना तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेलंगना राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएस प्रमुख आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असून यासंदर्भात ते प्रादेशिक पक्षांतील नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. आज त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांची भेट घेतली. तिरुअनंतपुरम येथे त्यांची विशेष बैठक पार पडली. यानंतर ते डीएमके प्रमुख एम के स्टालिन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी देखील ते चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. देशात सध्या लोकसभाचे निवणूक सुरु असून के चंद्रशेखर राव यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

बंद दाराआड दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात काँग्रेस आणि भाजप विना तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत के चंद्रशेखर राव प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे. 2019 लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या युपीए आणि भाजपच्या एनडीएला संपूर्ण बहुमत मिळणे अशक्य आहे. त्या धर्तीवर तिसरी आघाडी स्थापन झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक ठरु शकते, असे काही राजकीय जानकारांचं मत आहे. केरळचे मुख्यमंत्री यांच्या या भेटीनंतर के चंद्रशेखर राव उत्तर आणि पूर्व भारत दौ-यावर जाणार असून यासाठी केसीआरने सर्वप्रथम लेफ्ट पार्टीशी संपर्क साधला आसल्याचे बोलले जात आहे.

के चंद्रशेखर राव यांनी मागील वर्षी देखील देशात तिसरी घाडी स्थापन करण्यासंदर्भात संकेत दिले होते. याविषयावर त्यांनी डीएमके प्रमुख दिवंगत एम करुणानिधी आणि त्यांचा मुलगा स्टालिनसोबत चर्चा केली होती. करुणानिधी यांचे मागील वर्षी निधन झाले. त्याचबरोबर गेल्या वर्षी केसीआर यांनी उत्तर आणि पूर्व राज्यांचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांची भेट घेण्याकरिता ते दिल्लीला गेले होते, मात्र त्यांची भेट तेव्हा होऊ शकली नव्हती.