हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नाची दुनिया आहे. प्रत्येकजण तिथे आपले स्वप्न घेऊन जातो आणि एक छोटा मोठा उद्योग सुरु करतो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई ही क्षेत्रफळाने कमी होत आहे. त्यामुळे जागेची समस्या येथे निर्माण होते. यावर तोडगा म्हणून मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. तिसरी मुंबई म्हणून निर्माण होणारे हे शहर अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूद्वारे मुंबईशी जोडले जाईल असे सांगण्यात येत आहे. या नवीन तिसऱ्या मुंबईत विकसित शहराला साजेश्या सुविधा येथे असणार आहेत.
तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीची कल्पना मांडली होती उपमुख्यमंत्र्यांनी
तिसरी मुंबई निर्माण करण्याची कल्पना ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्येच मांडली होती. ते म्हणाले होते की, सध्या आपल्याकडे दोन मुंबई आहेत. मात्र पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्गी लागल्यानंतर तिसरी मुंबई साकारली जाईल. तसेच रस्ते, बंदराशी कनेक्टिव्हिटी असलेले आणि एक परिसंस्था म्हणून आकारास येणार हे शहर असेल. असे त्यावेळी सांगण्यात आले होते. आता या तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीस राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच भरगोस सुविधांनी युक्त असे नवीन शहर मिळणार आहे.
काय असेल तिसऱ्या मुंबईत?
नवीन म्हणजेच तिसऱ्या मुंबईत हे शहर सर्व सुविधा असणार आहेत. ज्यामध्ये लक्झरियस, तसेच परवडणारी घरे, व्यापारी संकुलं, डेटा सेंटर, बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी हब, बँका, वित संस्थांसाठी आवश्यक त्या सुविधा, नॉलेज पार्क अशा सगळ्या सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. तसेच खारघर येथे बीकेसीसारखी सुविधा, नवी पनवेल ते कर्जतसाठी रेल्वे कॉरिडॉर, एमएमआरमधील दुरच्या ठिकाणांचा विकास, न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी (NTDA), आणि दोनशे गावांचा समावेश हे या नवीन शहरात असावे असे अपेक्षित आहे.
काय आहे उद्दिष्ट?
या नवीन शहराच्या निर्मितीचे उद्दिष्ट हेच आहे की, आर्थिक चालना देणे, देशाच्या GDP मध्ये योगदान देणे, तसेच या योजनांमध्ये खारघरमध्ये दुसरे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) स्थापन करणे आहे. ज्यासाठी अंदाजे 150 हेक्टर जागा राखून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही तिसरी मुंबई नागरिकांच्या फायद्याची असेल. असे म्हणायला हरकत नाही.