तिसरी कसोटी : भारतीय फलंदाजांची हाराकीरी संपूर्ण संघ 78 धावांत परतला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन |  इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 78 धावात माघारी परतला आहे. एकामागोमाग एक फलंदाजाना तंबूत परतावे लागले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलदांजाचे कंबरडे मोडले. केवळ 40 षटकांत भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहूल याला पहिल्याच षटकात जेम्स एंडरसन याने शून्यावर माघारी परतवले. तर त्यानंतर भारतीय बॅंटीग लाईन गडगडल्याचे पहायला मिळाले. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा 1, विराट कोहली 7, रिषभ पंत 2, रविंद्र जडेजा 4, मोहम्मद शमी 8 नाबाद, जसप्रीत बुमराह 0, मोहम्मद सिराज 3 हे केवळ एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. तर रोहीम शर्मा याने 105 चेंडूत 19 धावा काढल्या असून केवळ 1 चाैकार मारला आहे. तर अजिंक्य रहाणे याने 54 चेंडूत 18 धावा काढताना 3 चाैकार लगावले आहेत. रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणे सोडल्यास एकाही फलंदाजास दोन अंकी धावा काढता आल्या नाहीत. तर पहिल्या डावात रोहीत शर्मा यांची 19 धावसंख्या सर्वोच्च  आहे. भारतीय संघाकडून पूर्ण डावात एकही षटकार मारला गेला नाही केवळ 6 चाैकार लगावले गेले आहेत.

इंग्लडकडून गोलंदाजीत जेम्स एंडरसन 3, रोबीसन 2, सॅम करन 2 आणि अोरटन 3 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ या कसोटीत विजय मिळवेल अशी शक्यता फार कमी असल्याचे दिसून येत आहे. भारतीय फलंदाजाची पहिल्या डावात मोठी हाराकीरी झाल्याचे पहायला मिळाले.

Leave a Comment