आमदार संतोष बांगर यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले ‘हे’ आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. बांगर यांनी संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला आता बांगर (Santosh Bangar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते संतोष बांगर ?
संतोष बांगर (Santosh Bangar) हे संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले होते संजय राऊत हा पागल झालेला पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

चंद्रकांत खैरे यांचे प्रत्युत्तर
संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या ह्या टीकेला चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर देताना म्हंटले कि, संतोष बांगर हा तडीपार आणि बरेच खुनाचे आरोप त्याच्यावर आहेत. सरळ करुन टाकू तुला आम्ही. मी स्वत: सरळ करेन.

संतोष बांगर यांचे खैरेंना आव्हान
चंद्रकांत खैरे वयाचं भान ठेवलं. आम्ही जर यांचं भांडं खोललं, तर मला वाटतंय चंद्रकांत खैरेंच्या क्लिप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आधी संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या संतोष बांगरांनी आता चंद्रकांत खैरेंना आव्हान दिले आहे. तसेच खैरेंच्या काही क्लिप्स आपल्याकडे असल्याचं सांगितलं. क्लिप्स बाहेर आल्या तर खैरेंना आत्महत्या करावी लागेल असंदेखील बांगर (Santosh Bangar) म्हणाले आहेत.

हे पण वाचा :
200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना दिले जातात अतिरिक्त फायदे
राज्यात तलाठ्यांची 4000 पदे भरण्यात येणार
लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात
सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?
पत्नीच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याने नैराश्यतेून पतीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल