‘या’ देशाने करून दाखवलं..! इथे आहे मास्कशिवाय फिरण्यास मुभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मास्क न घालता बाहेर जाण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कोरोना पासून वाचायचे असेल तर मास्क अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. परंतु काही दिवसांपूर्वी ज्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या होती त्या देशाने आता मास्क मुक्तीकडे वाटचाल केली आहे. त्या देशाचे नाव आहे अमेरिका. हो..! अमेरिकेने मास्क मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.

तुम्ही म्हणाल त्यांनी असं काय केलं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण… अमेरिकेनं मोठ्याप्रमाणावर लसीकरणाला गती दिली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका अधिक आहे अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्यानं कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे लसीकरण मोहीम विशेष खबरदारी घेतली जात आहे या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्क शिवाय जाण्यास मुभा दिली आहे.

ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणं वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी करोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्क शिवाय बाहेर जाऊ शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राकडून हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. मागील वर्षभर कोरोना संसर्गामुळे नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. आता लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यात मास्क शिवाय फिरण्यास मुभा मिळाल्यानं अमेरिकेच्या नागरिकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारी मुळे विस्कळीत झालेली जीवनाची घडी हळूहळू पूर्वपदावर येण्याची आशा पल्लवित आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोन विषाणूने ५ लाख 70 हजार लोकांचा बळी घेतला आहे.

Leave a Comment