मुंबई प्रतिनिधी / माढा लोकसभा मतदार संघातून साताऱ्यातील उद्द्योजक रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. रामदास माने हे प्रसिद्ध उद्दोजक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे निवडणूक चिन्ह पेनाची निब असणार आहे. माढ्याचा विकास हे महत्वपूर्ण ध्येय घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असून त्यांचा सामना राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी होणार आहे. माढ्यातील बेरोजगारी आणि येथील काही भागात पडणार दुष्काळ अशा समस्या आपण पहिल्या असून यामुळे या भागातील लोकांना खूप त्रास होतो, या समस्या निवारण्यासाठी आपण निवडणूक लढत असल्याचे रामदास माने यांनी सांगितले.
रामदास माने हे एका शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. माने हे ‘टॉयलेट मॅन’ या नावाने ओळखले जातात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून त्यांनी १७ राज्यात ते टॉयलेट ना नफा ना तोटा या तत्वावर दिली आहेत. जवळजवळ २३ हजार टॉयलेट त्यांनी लोकांना पुरवली आहेत. काही वर्षांपूर्वी जगातले सर्वात मोठी थर्माकॉल तयार करणारे मशीन त्यांनी बनविले आहे.
इतर महत्वाचे –
Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश