हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Changes from 1 August : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम सर्व सामान्याच्या जीवनावर होत असतो. आता जुलै महिना संपतो आहे आणि ऑगस्ट महिना येणार आहे. या महिन्यातही असे काही बदल होणार आहेत ज्याचा आपल्या खिशावर परिणाम होणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किंमती, इन्कम टॅक्स रिटर्न, पीएम किसान आणि बँकिंग सिस्टीम इत्यादींचा समावेश आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेउयात…
एलपीजीच्या किंमतीत बदल
गॅस कंपन्यांकडून दर महिन्याला एलपीजीच्या किंमतीची नवीन दर लिस्ट जारी केली जाते. अशा परिस्थितीत 1 ऑगस्टपासून (Changes from 1 August) गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी गॅस कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केले जाऊ शकतात. गेल्या वेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली होती तर घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी वाढला होता.
पीएम किसानचे केवायसी
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसीसाठी 31 जुलैपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. म्हणजेच आता येत्या महिन्यापासून शेतकऱ्यांना केवायसी करता येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन ई-केवायसी करता येते. याशिवाय घरबसल्या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ई-केवायसी ऑनलाइन करता येईल. केंद्र सरकारकडून ई-केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली गेली होती. यापूर्वी ई-केवायसीची शेवटची तारीख 31 मे होती. (Changes from 1 August)
बँक ऑफ बडोदाकडून चेक पेमेंटच्या नियमात बदल
बँक ऑफ बडोदाच्या खातेदारांसाठी 1 ऑगस्टपासून (Changes from 1 August) चेक पेमेंटच्या नियमात बदल केला गेला आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता 5 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत आता बँकेला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल ऍपद्वारे द्यावी लागेल.
पंतप्रधान फसल विमा योजनेसाठी रजिस्ट्रेशन
प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) चा लाभ घेण्यासाठी या योजनेमध्ये सर्वांत आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्याच्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर कोणतेही रजिस्ट्रेशन केले जाणार नाही. कृपया याची नोंद घ्या की. हे रजिस्ट्रेशन ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केले जाऊ शकेल. (Changes from 1 August)
ITR वर दंड
लोकांकडे आता फक्त 2 दिवस (आज आणि उद्या) ITR भरण्यासाठी आहेत. यानंतर, 1 तारखेपासून (Changes from 1 August) ITR भरण्यासाठी लेट फीस आकारली जाऊ शकते. आयकरदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, त्याला लेट फीस म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5,000 रुपये लेट फीस भरावे लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal
हे पण वाचा :
ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका
Commomwelath Games 2022 : मीराबाई चानूने गोल्ड मेडल जिंकत केला ‘हा’ नवा विक्रम
ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम
Car Loan : सेकंड हँड कार घेण्यासाठी अशाप्रकारे स्वस्त दरात मिळवा कर्ज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा