हे सरकार २६ जूनच्या आंदोलनाच्या आगीत जळून जाईल : मुनगंटीवारांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपनेही राज्या सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यांच्यानंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. हे सरकार भाजपच्यावतीने २६ जूनला करण्यात येत असलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या आगीत जळून जाईल, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पोट निवडणूका व ओबीसी आरक्षण याबाबत राज्य सरकारवर नागपूर येथे बुधवारी टीका केली. त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोपही केले. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. तर मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार फेल ठरले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या पदांच्या पोट निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.