ब्रिटनच्या महाराणीहून श्रीमंत आहे ‘ही’ भारतीय महिला; पती करतो ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन । ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे पती-पत्नी दोघेही भारतीय वंशाचे आहेत. अक्षता मूर्ती ही सेल्फ मेड टेक अब्जाधीश आणि भारतीय IT कंपनी Infosys चे फाऊंडर NR नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय अक्षता यांच्याकडे Infosys चे सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 7600 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. 2021 Sunday Times Rich List नुसार, यामुळे अक्षता मूर्ती राणी एलिझाबेथ II पेक्षा जास्त श्रीमंत बनल्या आहेत. राणी एलिझाबेथ II ची वैयक्तिक संपत्ती सुमारे $ 460 मिलियन किंवा 3400 कोटी रुपये आहे.

यामुळे सुनक सध्या अडचणीत आहेत
अक्षता आणि ऋषी सुनक यांच्याकडे किमान चार मालमत्ता आहेत, ज्यात केन्सिंग्टन, लंडनमधील £7 मिलियनचे पाच बेडरूमचे घर आणि कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथील एक फ्लॅट आहे. अक्षता ही व्हेंचर कॅपिटल कंपनी कॅटामरन व्हेंचर्सची संचालक देखील आहे, ज्याची तिने 2013 मध्ये सुनकसोबत सह-स्थापना केली होती.

मात्र, बिट्रेनच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेले सुनक सध्या काहीशा अडचणीत सापडले आहेत. सुनक यांच्याकडे एकेकाळी ब्रिटनचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात होते. मात्र, यूकेमधील वाढती महागाई आणि भारतीय कंपनीतील अक्षता यांच्या स्टेकच्या वादामुळे सुनकच्या लोकप्रियतेचा आलेख खाली आला आहे. याशिवाय मूर्तीच्या परकीय कमाईला ब्रिटीश टॅक्स अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचाही आरोप सुनक यांच्यावर आहे. त्यामुळे सुनक यांच्यावरील दबाव वाढला आहे.

अक्षताचीही स्वतःची कंपनी
मात्र, अक्षता मूर्तीने या आठवड्यात सांगितले की,” तिच्या Infosys च्या शेअर्स मधून मिळणारा रिटर्न केवळ यूकेच्या बाहेर कर आकारणीसाठी जबाबदार आहे. अक्षताने 2010 मध्ये स्वतःचे फॅशन लेबल अक्षता डिझाइन्स लाँच केले आहे. 2011 च्या व्होग प्रोफाइलनुसार, त्या Indian-meets-Western fusion कपडे तयार करण्यासाठी दुर्गम खेड्यांमधील आर्टिस्ट सोबत काम करतात.

अक्षताचे वडील नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये Infosys या दिग्गज टेक कंपनीची स्थापना केली. आपल्या पत्नीकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेऊन कंपनी सुरू करणाऱ्या मूर्ती यांची Infosys आज 100 अब्ज डॉलर्सची कंपनी बनली आहे. अमेरिकन वॉल स्ट्रीटवर लिस्टिंग होणारी Infosys ही पहिली भारतीय कंपनी होती.

2009 मध्ये दोघांनी केले लग्न
अक्षता आणि ऋषी यांची भेट एमबीएच्या अभ्यासादरम्यान अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली. ऋषी यांनी आधीच ऑक्सफर्डमधून प्रथम श्रेणीची पदवी घेतली होती. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. या रिसेप्शनला राजकारणी, उद्योगपती आणि क्रिकेटपटूंसह सुमारे 1,000 पाहुणे उपस्थित होते.

Leave a Comment