हे तर सरकारच षडयंत्रच; कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणुका होऊ देणार नाही : बावनकुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील पाच जिल्ह्यातील पोट निवडणुकीवरून ओबीसी समाजातील नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला असून आज भाजपचे नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका करीत हल्लाबोल केला. ओबीसी समाजाच्या विरोधात ठाकरे सरकार एक प्रकारचे षडयंत्रच करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणूक होऊ देणार नसल्याचा इशारा बावनकुळेने दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त असलेल्या पदांच्या पोट निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकीवरून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले आहेत कि, राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची दोन महिने वाट पहिली. मात्र, या ठाकरे सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवणूक कार्यक्रम जाहीर केला. मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूक न लावू देण्याचे सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ सर्वोच्च न्यायालयात जावे तसेच निवडणूक रद्द कराव्यात. अन्यथा आम्ही या निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

You might also like