टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे असे करा नियंत्रण

पुणे | राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे.

या कीटकनाशकांचा करा वापर

इनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली.

बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंब आधारित आझाडिरेक्टिन (300पिपीएम ) 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. बि. टी जिवाणूजन्य कीटकनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.

याबरोबरच लागवड करताना मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे ठरते. लागवडीनंतर 40 45 दिवसांनी शेतात टायको ग्राम चीलोनिस हे मित्रकीटक एक लाख प्रति हेक्‍टरी या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा सोडा. हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडीची अंडी शोधून त्यात स्वतःची अंडी घालतात परिणामी फळ पोखरणारी कीड अंडी अवस्थेतच नष्ट होतात. शेतात एकरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे लावावे. किडलेली फळे काढून खोल खड्ड्यात गाढून टाकावीत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like