सावधान! कोरोनामुळे फक्त चव आणि वासच नव्हे तर आवाज जाण्याचा ही धोका; तज्ञांनी दिली माहिती

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दीदीचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे चव आणि वासानंतर आवाज देखील जाऊ शकतो अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.

नुकतीच कोविड-19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे. या केसमधून अमेरिकेच्या संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोनामुळे मज्जासंस्थेशी संबंधित किंवा न्यूरोपॅथिक गुंतागुंतही निर्माण होऊ शकते. यामुळे व्होकल कॉर्डला पॅरालिसीस होतो. इतकेच नव्हे तर, कोरोना संसर्गामुळे फक्त केवळ चव आणि वासच नाही तर घशाचा आवाज देखील जाऊ शकतो. यालाच व्होकल कॉर्ड पॅरालिसिस असे म्हणले जाते.

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या 752 रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षांमध्ये मे महिन्याच्या नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, कर्नाटकमध्ये कोरोनामुळे एका लग्नाचा तर राजस्थानमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 3420 चा आकडा पार केला आहे.