नवरा-बायकोच्या हातावरील ‘ही’ रेषा बनू शकते भांडणाचे कारण; पहा तुमच्या हातावर ही रेषा आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या तळहातावरील रेषा काही प्रमाणात आपलं भविष्य दर्शवतात, अशी काहीच समजूत आहे. अनेक लोक कोणतेही महत्वाचे काम करण्याअगोदर किंवा आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी हस्तरेषा शास्त्राचा आधार घेतात. हस्तरेषा शास्त्रामध्ये लग्नासाठी विवाह रेषा खूप महत्वाची मानली जाते.हस्तरेषा ही ज्योतिषशास्त्राची लोकप्रिय पद्धत आहे. हस्तरेषेद्वारे एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याबद्दल माहिती दिली जाऊ शकते. हस्तरेषा शास्त्रानुसार, जर व्यक्तीची विवाह रेषा हृदय रेषेच्या दिशेने येत असेल. तर पती-पत्नीमध्ये समन्वय राहत नाही.त्याच्यात भांडणे होतात.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यक्तीच्या हातामध्ये दोन प्रकारच्या विवाह रेषा असतात. एक वरच्या दिशेने दुसरी खालच्या दिशेने. ही रेषा पुढे जाऊन हृदय रेषेकडे वळते किंवा करंगळीकडे वळते. दोन्ही परिस्थितींमध्ये त्याचा परिणाम मूळच्या वैवाहिक जीवनावर होतो. लग्नानंतर पती-पत्नीचे वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी होते जेव्हा दोघेही परस्पर सामंजस्याने राहतात, परंतु काहीवेळा काही विशिष्ट परिस्थितींमुळे ते विभक्त होण्याची परिस्थिती उद्भवते. हस्तरेषा शास्त्र मानते की, वैवाहिक जीवनातील तणावासाठी हातावरील रेषादेखील कारणीभूत ठरू शकतात.

हस्तरेषा शास्त्रानुसार, जर व्यक्तीची विवाह रेषा हृदय रेषेच्या दिशेने येत असेल. तर पती-पत्नीमध्ये समन्वय राहत नाही. अनेकवेळा अशा परिस्थितीत लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद होतात. मात्र, लग्नाची रेषा हृदय रेषेला भिडल्यास आरोग्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये मतभेदाची परिस्थिती निर्माण होते.

जर स्त्रीच्या डाव्या हाताच्या मस्तिष्क रेषा आणि हृदय रेषा सारखी असेल तर स्त्रीचे विचार पतीसोबत जुळत नाहीत. जर एखाद्या स्त्रीची जीवनरेषा आणि भाग्यरेषा शेजारी शेजारी असेल तर राहू रेषा भाग्यरेषा ओलांडताना दिसेल, तरीही तिचा पती तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टींमध्ये अडथळे अनु शकतो. अशा स्थितीत पती पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.