हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जगभरात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात अनेक चढ उतार पहायला मिळत आहेत. मात्र शेअर बाजारामध्ये अशा काही कंपन्यांचे शेअर्स देखील आहेत जे अशा वातावरणातही गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लिमिटेडचे नाव देखील सामील आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 120 टक्क्यांहून जास्तीने वाढले आहेत. तसेच याद्वारे गुंतवणूकदारांना सातत्याने मोठा नफा मिळालेला आहे. हा स्मॉल-कॅप स्टॉक भारतीय शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. गेल्या एका महिन्यात या पेट्रोलियम कंपनीचे शेअर्स सुमारे 270 रुपयांवरून 590 रुपयांपर्यंत वाढले आहेत. यावेळी यामध्ये 120 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहेत. Multibagger Stock
मार्केटमध्ये अश्याही अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांची सुरुवात अगदी लहान पातळीपासून सुरू होते मात्र अल्पावधीतच ते गुंतवणूकदारांना भरपूर मोठा नफा मिळवून देत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2022 या फक्त एकाच आर्थिक वर्षामध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना चार पट फायदा मिळवून दिला आहे. याबरोबरच आता या कंपनीच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. Multibagger Stock
6 महिन्यांत दिला 300 टक्क्यांहून जास्त रिटर्न
गेल्या सहा महिन्यांत हे शेअर्स 144 रुपयांवरून 590 रुपयांपर्यंत वाढले आहेत. यावेळी भागधारकांना 300 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न मिळालेला आहे. गेल्या काही वर्षांत तर या मल्टीबॅगर स्टॉकने भागधारकांना 700 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
4 वर्षात भागधारकांना केले मालामाल
फक्त गेल्या एका वर्षात हे शेअर्स 49.50 रुपयांवरून 590 रुपयांपर्यंत वाढले आहेत. यावेळी गुंतवणूकदारांना सुमारे 1100 टक्के रिटर्न मिळाला आहे. त्याचप्रमाणे, जून 2018 पासून आतापर्यंत हे शेअर्स 12.50 रुपयांवरून 590 रुपयांपर्यंत वाढले आहे. या 4 वर्षांत या शेअर्सने 4600 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/confidence-futuristic-energetech-ltd/cfel/539991/
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा