नवी दिल्ली । सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशनची सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 जून 2021 होती, मात्र आता ती पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेबद्दल अधिक माहिती http://labour.gov.in वर लॉग इन करून मिळवता येईल. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने अलीकडेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ABRY अंतर्गत रजिस्ट्रेशन सुविधेची तारीख वाढवण्याबद्दल ट्विट केले आहे. #ABRY अंतर्गत रजिस्ट्रेशनची सुविधा 31.03.2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
Registration facility under #ABRY has been extended till 31.03.2022.#ABRY के तहत पंजीकरण सुविधा 31.03.2022 तक बढ़ा दी गई है।#EPFO #Employees pic.twitter.com/aYdiwG7pzc
— EPFO (@socialepfo) November 24, 2021
तुम्ही अशाप्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता
ARBY अंतर्गत रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. EPF आणि MP कायदा 1952 अंतर्गत रजिस्टर्ड नवीन कर्मचारी आणि नवीन आस्थापना 31 मार्च 2022 पर्यंत रजिस्ट्रेशनसाठी पात्र आहेत. अधिक माहीतीसाठी आणि रजिस्ट्रेशनच्या डिटेल्ससाठी, EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर इच्छुकांना ABRY टॅबवर जावे लागेल.
EPF मध्ये केंद्र सरकारची मदत
ते म्हणाले की,”10 ऑक्टोबर 2020 पासून नियोक्त्यांना सुरक्षितता लाभांसह रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि रोजगार पुन्हा रुळावर आणण्यासाठी आत्म निर्भार भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे.” ते म्हणाले की,” EPFO द्वारे चालवल्या जाणार्या या योजनेमुळे नियोक्त्यावरील आर्थिक दबाव कमी होतो. त्याच वेळी ते त्यांना अधिक कामगार घेण्यास प्रोत्साहित करते.”