मोदींनी योग्य नियोजन केले असते तर ही परिस्थिती आली नसती : बच्चू कडूंचा प्रहार

0
66
BACHCHU KADU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. देशातील करुणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मोदी यांचे नियोजन कमी पडत आहे अशी टीका विरोधकांमधून तीव्रतेने केली जात आहे. एवढंच नाही तर कोरोना परिस्थितीवरुन परदेशातूनही मोदींवर टीका केली जात आहे. आता प्रहार जनशक्ती चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सरळ निशाणा साधला आहे. ‘मोदींनी देशभरात योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशी टीका त्यांनी केली आहे. अहमदनगर येथे प्रहार जनशक्ती च्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याच्या पाहणी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे. जर पंतप्रधान मोदींनी देशभरात योग्य नियोजन केले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती” अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपच्या नेत्यांनी टीका करण्याशिवाय काही केले नाही

भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करण्याशिवाय काहीच केलं नाही. अशी टीका देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीये. केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकार कडे जाऊन काही निवेदन दिले का किंवा केंद्राकडून काही मदत आणली आहे का ? असं कुठेही झालं नाही त्यांनी जर काही मदत आणून दिली असती तर तेवढाच हातभार लागला असता. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारचे चांगले नियोजन

पुढे बोलताना ते म्हणाले ‘राज्य सरकारने चांगल्या प्रकारे नियोजन केला आहे. देशात सर्वात चांगले व्यवस्थापन राज्यात आहे. जगभरात महाविकास आघाडी सरकारचे कौतुक होत आहे तर राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत आहे. हे सर्वांनी पाहिले इतर राज्यांपेक्षा आपली व्यवस्था चांगली आहे असेही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here