….ही रेल्वे तात्पुरती औरंगाबाद- मनमाड मार्गे धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण चे काम पूर्ण करण्याकरिता तसेच इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता नॉन-इंटरलॉक  ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे (गाडी क्रमांक ०७६१४/०७६१३) नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष मार्गे परळी, लातूर या गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस मार्ग बदलून परभणी औरंगाबाद-मनमाड मार्गे धावणार आहे.

आठवड्यातून सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी या चार दिवशी नांदेड – पनवेल-नांदेड रेल्वेचा नियमित मार्ग बदलून  परभणी, औरंगाबाद-मनमाड मार्गे धावणार आहे. या मार्ग बदलेल्या गाडीचा क्रमांक देखील बदलण्यात आला आहे. या रेल्वेचा जुना क्रमांक ०७६१३/०७६१४ असा होता, तो क्रमांक बदलून ०७३१३/०७३१४ असा करण्यात आला आहे. हा बदल तात्पुरता स्वरूपात केला असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गाडी क्रमांक ०७३१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मार्च  रोजी परळी, लातूर, कुर्दुवारी  मार्गे न धावता मार्ग बदलून परभणी येथुन सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटाने सुटेल तर सेलू- परतूर- जालना- औरंगाबाद  मार्गे मनमाड, कोपरगाव, पुणे मार्गे  धावून पनवेल येथे दुपारी १२ वाजून ३० मिनिटाने पोहोचेल.

तसेच (गाडी क्रमांक ०७३१३) पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक १९, २१, २३, २५, २६, २८ आणि ३०  मार्च, २०२१  रोजी पनवेल येथून सायंकाळी ४ वाजता सुटून लातूर, परळी मार्गे न धावता तिचा मार्ग बदलून पुणे येथून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटाने सुटेल तर कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद,  जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा मार्गे नांदेड येथे सकाळी ११ वाजता पोहोचेल .

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment