यंदा 21 वे वर्ष : घारेवाडीत सात जानेवारीपासून बलशाली युवा हदय संमेलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शिवमं प्रतिष्ठानच्यावतीने यंदा बलशाली युवा हदय संमेलनाचे दि. 7 ते दि. 9 जानेवारी दरम्यान घारेवाडीत आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रख्यात वक्त्यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.

बलशाली युवा हंदय संमेलनाचे यंदा 21 वे वर्ष आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी दि. 7 जानेवारीला सकाळी दहा वाजता कोल्हापूरच्या संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते होईल. त्यानंतर त्यांचे स्वतःला ओळखा, स्वतःला घडवा या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर आसामच्या जोरहाट येथील पद्मश्री जादव पाईंग यांची प्रकट मुलाखत होईल. दुपारी चार वाजता पुणेतील करियर मार्गदर्शक प्रशांत पुष्पाल यांचे करियर व स्ट्रेस मॅनेजमेंट यावर व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळही सहा वाजता पुणे येथील लक्ष्य फौंडेशनच्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांचे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा-सैनिक या विषयावर व्याख्यान होईल.

शनिवारी दि. 8 जानेवारीला सकाळी 9 वाजता इंदापुरच्या सोनाई दूध संघाचे संस्थापक दशरथ माने यांचे धवल क्रांतीची सोनेरी यशोगाथा या विषयावर व्याख्यान होईल. सकाळी अकरा वाजता  नागपूर स्लम सॉकरचे संस्थापक प्रा. विजय बारसे यांचे विजयी गोल यावर व्याख्यान होईल. दुपारी दोन वाजता सांगलीच्या आटपाडीतील रक्षक ग्रुपचे रणजितसिंह पाटील यांचे स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी यावर तर दुपारी चार वाजता नागपूरचे ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचे गांधीजी समजून घेताना या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळी प्रा. सुरेश शुक्ल कोल्हापूर यांचा जागो हिंदूस्थानी हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होईल.

समारोप दि. 9 जानेवारीला सकाळी अभिरामजी प्रभू यांचे नाम संकिर्तन होईल त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या आयपीएस इल्मा अफरोज यांचे कुंदरकी ते आयपीएस व्हाया ऑक्सफर्ड या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी साडेअकरा वाजता शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानाने समारोप होईल. त्यासाठी युवक-युवतींनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन श्री. पाटील व सहकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment