महाराष्ट्र विकणं चहा विकण्यासारखं वाटलं का? राष्ट्रवादीचं पडळकरांना चोख प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर जोरदार टीका करत जर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला तर ते राज्यच विकतील अस म्हंटल होत. पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार अमोल मिटकरी यांनी पडलकरांवर निशाणा साधला. महाराष्ट्र विकणं चहा विकण्यासारखं वाटलं का? असा टोला त्यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कोणती टीका कोण का करतो? हे सर्वांनाच माहीत आहे. उठसूट चर्चेत राहण्याकरिती अकलेचं दिवाळं काढणारे हे लोकं असे विधान करतात. राज्य विकणे म्हणजे ह्यांना चहा विकण्यासारखे वाटेल का? भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकायला निघाले आहेत, यांनी सगळेच विकले आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.

पडळकर नेमकं काय म्हणाले-

अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देणं म्हणजे अधिवेशन संपण्याअगोदर महाराष्ट्र विकून टाकतील. त्यांच्याकडे कशाला चार्ज देत आहात. कारण सरकारमधला तुम्ही त्यांना काही भाग दिला आहे. २ लाख ५० हजार कोटींच्या वरचा निधी त्यांनी त्यांच्या लोकांना दिला आहे. जर तुम्ही त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दिला. तर हे राज्य विकून खातील. दुसरं काहीही करू शकत नाहीत अशी टीका पडळकर यांनी केली होती.

Leave a Comment