सातारा | कोरेेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 101 वाहन धारकांकडून दिवसभरात 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. शहरात काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, असा इशारा पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिला आहे.
कोरेगाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला. कोरोना रोखण्यासाठी शासनाने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर निर्बंध घातले असून, पोलिस कारवाईचे आदेश दिलेत.
त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक उपनिरीक्षक विजय जाधव, केशव फरांदे, हवालदार मिलिंद कुंभार, धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, वाहतूक नियंत्रण शाखेचे समाधान गाढवे, महेश जाधव, जस्मीन पटेल, प्रशांत लोहार यांच्यासह गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहरातील विविध ठिकाणी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group