हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर मधील सभा संपवून जरांगे-पाटील हे रात्री साडे दहाच्या सुमारास इस्लामपूर (जि. सांगली) येथे दाखल झाले असून त्यानंतर ते कराड येथील सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कराडमधील सभेला अजून काही तास बाकी राहिले असताना मराठा बांधव मोठ्या संख्येने शिवाजी स्टेडियमवर दाखल झाले लागले आहेत. यामध्ये महिला, तरुणींची संख्या लक्षणीय आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेला कराड -पाटण तालुक्यासह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यांतील मराठा बांधव-भगिनी मोठ्या संखेने उपस्थित आहेत. कराड सभेसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठा बांधवांच्या चहा-नाष्ट्याची स्टेडियममध्येच व्यवस्था केलेली आहे.
https://fb.watch/onqgBbZt7l/?mibextid=CDWPTG
संपूर्ण राज्याचं जरांगे पाटील यांच्या येथील होणाऱ्या सभेकडे लागले आहे. या ठिकाणी सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी डॉग स्कॉड, स्पेशल पोलिसांची टीमने सभास्थळी दाखल होत तपासणी केली आहे.
मराठा समाजातील आबाल वृद्धांशी संवाद साधण्यासाठी जरांगे- पाटील आज कराड येथे येत आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये त्यांची विराट सभा काही तासात होणार आहे.