सातारा प्रतिनिधी | महेश पवार
सातारा शहरात जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारो युवकांनी गर्दी करून नियमांची पायमल्ली केली. या फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाजपाच्या नगरसेविका सुवर्णा पाटील असल्याने कदाचित प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत असल्याचे सातारकरांना पहायला मिळाले.
सातारा शहरात असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर हा प्रकार घडला. कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत ज्योतिर्मय महोत्सव घेण्यात आला आहे. कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता हजारो लोक या महोत्सवात आले. एवढेच नाही तर या महोत्सवात कपडे काढून युवकांचा डान्स सुरू असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र अद्याप प्रशासनला तीन माकडांप्रमाणे अद्याप काहीही दिसले, ऐकले नाही त्यामुळे ते बोललेही नाही.
जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ऐन कोरोना काळात डिजेच्या तालावर युवकांच्या थिरकण्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोना काळात गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी असताना देखील साताऱ्यात देखा ना या हाय रे सोचा ना गाण्यावर हजारो युवक कोरोनाचे नियम मोडून थिरकताना दिसले. मात्र जिल्हा प्रशासनाची अद्याप याबाबतची भूमिका तीन माकडांप्रमाणे आहे.
प्रशासनाला फाट्यावर मारून कार्यक्रम
शासनाच्याच जिल्हा परिषद ग्राऊंडवर महोत्सवाला गर्दी होणार हे माहीत असताना देखील जिल्हा प्रशासनाने यांना परवानगी दिली कशी? तर नियम फाट्यावर मारुन कार्यक्रम सुरू असताना प्रशासन झोपा काढते का ? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर हा प्रकार घडत असताना प्रशासन नक्की झोपा काढते आहे का असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.