मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. हा फोन भारताबाहेरुन आल्याची माहिती आहे. तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन कॉल आला आहे.. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं. दरम्यान, गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. परंतु याबाबत गृहमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या प्रकरणी मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचंही कळतं.
“कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असं गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावरुनच त्यांना कालच धमकीचा फोन आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.