हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच मुंबई मंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या याचा तपास घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तर गेल्या पंधरा दिवसांमध्ये हा धमकीचा दुसरा फोन आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील असाच एक फोन घेऊन गेला होता ज्यात मंत्रालय बॉम्बने उडवून दिले जाईल अशी धमकी देण्यात आली होती.
सध्या हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच हा फोन कुठून आला कोणत्या व्यक्तीने केला याचा शोध घेतला जात आहे. मुख्य म्हणजे या फोन कॉलनंतर मुंबई मंत्रालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण परिसराचा तपास घेतला जात आहे. अद्याप या फोन कॉलबाबत पोलिसांच्या हाती कोणतीही माहिती लागलेली नाही. मात्र एकीकडे हा धमकीचा फोन मस्करी म्हणून करण्यात आल्याचे देखील म्हणले जात आहे.