हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलतोय असं सांगून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा खळबळ जनक आरोप जळगाव शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शनिवारी जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी होत असतानाच गुलाबराव वाघ याना फोन आला. सदर व्यक्तीने मी एकनाथ शिंदेंचा पीए बोलत असून तुम्ही आमदारांचा विरोध का करत आहात? विरोध करायचा नाही नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी दिली.
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. बंडखोरांचा यापुढे विरोध करूच. असे प्रत्युत्तर गुलाबराव वाघ यांनी दिले तसेच त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार संबधित मोबाइल क्रमाकांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




