व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

FIR नसलेल्या युवकालाच सैन्य भरतीत घेतले जाणार, प्रमाणपत्रही लागणार द्यावं; तिन्ही सेना दलाची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया संदर्भात आज तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नसून यापुढे आता या योजने अंतर्गतच तिन्ही सैन्य दलात भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के सल्याशिवाय अग्निवीरांना सेवेत सहभागी होता येणार नसल्याचे तीनही सेना दलांच्या वतीने लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी सांगितले.

आज तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या वतीने पत्रकार परीक्षा घेत केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजनेबाबत महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी अग्निपथ योजने अंतर्गत येत्या 24 जूनपासून वायू दलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल. 2050 पर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही 50 वर्षाच्या आतील असेल त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज असल्याचे पुरी म्हणाले.

 

केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकाणी युवकांची निदर्शने केली जात आहेत. बिहारमध्ये तर युवकांच्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या योजने अत्रतर्गत केल्या जाणाऱ्या भरती मधील युवकांची वयोमर्यादा आणखी दोन वर्षांनी वाढवली. तर संरक्षण मंत्रालय तसेच कोस्ट गार्डने या अग्निवीरांसाठी 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. 1989 साली यावर काम सुरू झाले होते, अशी माहितीही यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.