खळबळजनक! परभणी शासकीय रुग्णालयातुन तीन कोरोना बाधीत कैद्यांचे पलायन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

एखाद्या चित्रपटातील दृष्यात पाहिली असेल अशी घटना आज पहाटे परभणी शासकीय रुग्णालयात घडली असुन कोरोना वार्डात उपचार घेत असलेले व परभणी कारागृहात गंभीर स्वरूपाच्या गुन्हात कैदेत असणारे तिन कैदी खिडकीचे लोखंडी गज कापत बेडशीट च्या चादरीचा वापर करत फरार झाली आहेत.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या कोरोना वॉर्डातून, हे तिन्ही रुग्ण फरार झाल्यामुळे, कैद्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी आता कैद्यांचा कसुन शोध सुरू केला आहे.

ऑगष्ट महिण्यात परभणीच्या कारागृहामध्ये असणाऱ्या कैद्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता यामध्ये तब्बल ८४ कैद्यांना कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले होते. यातील सोळा कैद्यांवर, परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. यासाठी शासकीय रुग्णालयातील, तिसऱ्या मजल्यावर एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली होती.

आज पहाटे यापैकी तीन कैदी खिडकीचे गज कापून, बेडशीटचे चादर यांच्या साहाय्याने फरार झाले आहेत.
विशेष म्हणजे फरार झालेले तीनही कैदी हे गंभीर गुन्हा मधील कैदी असून सोबतच कोरोना बाधीत आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान यासर्व घटनाक्रमात पोलीस आणि रुग्णालय प्रशासनावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या कोरोना विशेष वार्डसाठी ठेवण्यात आलेली आरोपींची सुरक्षाव्यवस्था नेमके काय करत होती हाही प्रश्न उभा राहिलाय

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’