खरंच…1 सप्टेंबरपासून देशभरातील प्रत्येकाचे वीज बिल माफ होणार? या बातमीबद्दलचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होते. सध्या जी बातमी व्हायरल होत आहे त्यात वीज बिल माफ करण्याविषयी म्हंटले गेले आहे. जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. त्याअंतर्गत सप्टेंबरपासून संपूर्ण देशात प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल. हा दावा बनावट असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकचे म्हणणे आहे. सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

 

वीज बिल माफीची बातमी खोटी आहे
PIB Fact Check म्हणतात की, या बनावट व्हिडिओमध्ये केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे.

PIB Fact Check
PIB Fact Check केंद्र सरकारच्या धोरण / योजना / विभाग / मंत्रालयांविषयीची चुकीची माहिती पसरवण्यासाठी प्रतिबंधित करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेतली जाऊ शकते. त्यासाठी PIB Fact Check च्या 918799711259 वर व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल पाठवू शकतो किंवा [email protected] वर मेल करू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

You might also like