‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत

मुंबई । राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग अधिक फैलावत असल्याचं निदर्शनास आलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी काही जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनचे संकेत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लावायचा विचार आहे. मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसतेय. अमरावती विभागात जास्त रुग्णसंखेत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत’ असं अजित पवारांनी सांगितलं.

अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत सध्या काय परिस्थिती आहे याबाबत आज अढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ‘लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी माझं बोलणं झालंय,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. ‘कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढत आहे, लोक मास्क लावत नाहीत. नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन लागू शकतो आणि निर्बंधही अधिक कठोर करण्यात येतील,’ असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like