व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ऐकावं ते नवलंच! तरुणाने बाईकलाच बनवले जेसीबी! आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात. आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असेच एक जुगाड प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. महिंद्रा यांनी ट्विट केलेले हे जुगाड खूप व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, भारतीयांनी कमावलेले ‘जुगाडू’चे शीर्षक कोणीतरी हिसकावून घेतल्याचे म्हटले आहे.

आनंद महिंद्रा यांना त्यांच्या युएसमधील त्यांच्या मित्राने एक फोटो पाठवला. तो त्यांनी ट्विटरवरती शेअर केला. आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेच्या एका मित्राने हा फोटो पाठवला आहे. आमचा जुगाड चॅम्पियन हा किताब धोक्यात आहे. महिंद्रा लोडर एका बाईकमध्ये जोडला गेला आहे. हे पाहणे खुपच मनोरंजक आहे’. एक ट्विट आणि त्यावरील फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

लोकांना हे जुगाड खूप आवडले असून, त्यांनी महिंद्रा यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या कमेंट्स करणे सुरू केले आहे. तीन हजारांपेक्षा जास्त लाइक्स आतापर्यंत या फोटोला मिळाले आहेत. कमेंटमध्ये लोकांनी आनंद महिंद्रा यांना विश्वास दिला आहे की, ‘ जुगाडमध्ये भारतीयच अव्वल राहतील. महिंद्रा आहे तर आपण सर्व काही करू शकतो. असेही काही जुगाडू वापरकरते कमेंट करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.