डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन हा वाद (beating) झाला होता. हि घटना डोंबिवली पूर्वतील रामनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीचे (beating) सीसीटीव्ही फुटेज समोर आले तरी पोलिसांनी त्यावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. देवराज पटेल दुबरीया, मयुर पटेल दुबरीया, प्रितेश पटेल दुबरीया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बाजूच्या दुकानमालकासह त्याची पत्नी आणि मेहुणीला मारहाण (beating) केली आहे.
डोंबिवलीत कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेल्या पुतळ्यावरुन झालेल्या वादातून दुकान मालकासह तिघांना बेदम मारहाण pic.twitter.com/Wa7zobCErH
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 4, 2022
दुकानातील साहित्याची तोडफोड
डोंबिवली पूर्वेला स्टेशनच्या बाहेर राजेंद्र शेलार यांचे कपड्याचे आणि इतर साहित्याचे दुकान आहे. शेलार यांच्या दुकानाच्याच शेजारी देवराज पटेल दुबरीया याचे देखील कपड्याचे दुकान आहे. देवराज पटेल दुबरीया हा आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानाला खेटून ठेवत असे. अनेक वेळा विनंती करूनही देवराज तो पुतळा हटवत नव्हता. शेलार यांनी काल मंगळवारी पुन्हा देवराजला पुतळा हटवण्यास सांगितले.
याचा राग आल्याने देवराज दुबरिया, त्याचे दोन मुलगे मयुर आणि प्रितेश यांनी शेलार याच्या दुकानात शिरून दुकानातील छत्री व इतर सामान घेऊन शेलार यांच्यासह त्यांची पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना यांना बेदम मारहाण (beating) केली. हि संपूर्ण मारहाणीची घटना शेलार यांच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर जखमी शेलार कुटुंबीयांनी देवराज दुबरिया, मयूर दुबरीया आणि प्रितेश दुबरीया यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात (beating) तक्रार दाखल केली. रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?