नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईसोबत रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला (leopard attack) केला आहे. या हल्ल्यात त्या लहानग्याचा मृत्यू झाला आहे. लकी वीरसिंग पाडवी असे या हल्ल्यात (leopard attack) मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तळोदा तालुक्यातील सरदार नगर भागात हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण (leopard attack) निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
काय घडले नेमके ?
तळोदा तालुक्यातील सरदार नगर पुर्नवसन वसाहतीच्या परिसरात राहणारा लकी आईसोबत गुरे चारण्यासाठी गेला होता. यावेळी रानात गुरं चारत असताना बिबट्याने अचानक लकी व त्याच्या आईवर हल्ला (leopard attack) केला. यावेळी आई बारदा बिरसिंग पाडवी या जखमी (leopard attack) झाल्या तर त्यांचा मुलगा लकी वीरसिंग पाडवी याचा मृत्यू झाला.
बिबट्याने सुरवातीला त्यांच्यासोबत असलेल्या बकऱ्यांवर हल्ला (leopard attack) करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विरोध करण्यास गेलेल्या आईवर बिबट्याने हल्ला (leopard attack) केला. मात्र बारदा यांनी तिथून कसाबसा पळ काढला. मात्र त्यानंतर बिबट्याने तिथे उपस्थित लकीवर हल्ला (leopard attack) चढवला आणि यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???