नागपूर महामार्गावर ST ला भीषण आग, बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 35 जणांचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना (thrill of burning bus)घडली आहे. महामार्गावरच बसने पेट घेतल्याने काही वेळ त्या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. हि नागपूर आगाराची एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती.

काय घडले नेमके?
अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने येत असताना गाडी खराब झाल्याचे एसटी बस चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने बस बाजूला लावली. यानंतर त्याने गाडीतील 35 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना (thrill of burning bus) टळली असून बसमधील सगळे प्रवाशी सुरक्षित असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि हि आग विझवली मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक (thrill of burning bus) झाली होती.

मागच्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात आज सकाळी येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक (thrill of burning bus) झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. हि बस यवतमाळहून चिंचवडकडे येत होती. तसेच काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय