थरारक ! INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, जीव वाचण्यासाठी एक रात्र एक दिवस पाण्यात होते कर्मचारी

0
41
ins kochi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला. या वादळाच्या तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा बचावकार्य अद्यापही सुरू आहे. हिरा ऑईल फील्डमध्ये ‘बार्ज पी- 305’ वर अडकलेल्या जवळपास 184 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि शोध पथकाला यश आले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सहाही व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत. मागील ३ दिवसांपासून हे बचावकार्य अद्यापही सुरु आहे.

‘बार्ज पी- 305’वरून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आय एन एस कोलकता या युद्धनौका तसंच ग्रिट शिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्यानं समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे ऑपरेशन 17 तारखेला सुरू झाले होते. युद्धनौका आयएनएस कोचीवरून 125 जणांना समुद्रकिनारी आणण्यात आलं तर 65 जणांना इतर जहाजांत द्वारे आणण्यात आले आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरु आहे. ‘बार्ज पी- 305’वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात ही तटरक्षक दलाला यश मिळाले आहे.

११ तासांचा थरारक प्रसंग

या वादळाचा थरारक अनुभव सांगताना अमित कुमार कुशवाह यांनी सांगितले की,”बार्ज पी- 305’ बुडत होते म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली मी तब्बल अकरा वाजता समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवलं”. असं क्रू मेंबर अमित कुमार कुशवाह यांनी सांगितला आहे. तब्बल अकरा तास आपला जीव वाचवण्यासाठी तडफडणाऱ्या कुशवाह यांना आपला अनुभव सांगताना रडू कोसळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here