ICC विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांची विक्री ‘या’ दिवसापासून सुरू होणार

ICC World Cup 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC कडून एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी आयसीसीने हे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा यामध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असलयाने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 5 ओक्टोम्बर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हि स्पर्धा खेळवण्यात येणार असून सामन्याची तिकीट कधी खरेदी शकतो याकडे चाहते डोळे लावून बसलेत. अशाच क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या तिकीट विक्री संदर्भात ICC ने मोठी अपडेट दिली आहे.

त्यानुसार, विश्वचषक सामन्यांची तिकिटे सात टप्प्यात विकली जाणार आहेत. या तिकिटांची विक्री येत्या 25 ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. या तिकिटांच्या विक्रीची संपूर्ण माहिती www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या वेबसाईटला भेट देऊन तिकीट बुक करता येऊ शकते. मुख्य म्हणजे, 15 सप्टेंबरपासून विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकिटे विकली जातील.आयसीसीकडून तिकीट विक्री संदर्भात वेळापत्रक देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, ऑस्ट्रेलियाच्या सामन्याचे तिकीट 31 ऑगस्ट रोजी खरेदी करता येऊ शकते. तसेच, अफगाणिस्तान 31 ऑगस्ट, बांगलादेश 31 ऑगस्ट, इंग्लंड 1 सप्टेंबर, न्यूझीलंड 1 सप्टेंबर, श्रीलंका 1 सप्टेंबर, पाकिस्तान 3 सप्टेंबर, दक्षिण आफ्रिका 2 सप्टेंबर, नेदरलँड्स 2 सप्टेंबर या तारखांना सामन्यांचे तिकीट खरेदी करता येऊ शकते. याबाबतची सर्व माहिती ICC वेबसाईटवर देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषक सामना पार पडणार आहे. परंतु यावेळी काही सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. एकूण 9 सामन्यांचे वेळापत्रक यावेळी बदलण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. गेल्या 2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. आता पुन्हा यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. मुख्य म्हणजे, नवीन वेळापत्रकात एकूण नऊ सामन्यांचे शेड्युल बदलण्यात आले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील सामना आता १५ ऑक्टोबरला नाही तर १४ ऑक्टोबरला होणार आहे.