Tips For Long Life | महिलांसाठी त्यांचे सौंदर्य खूप महत्त्वाचे असते. ते त्यांच्या सौंदर्याला टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत असतात तसेच वेळ पडल्यास डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. परंतु आपल्याला अगदी चिरकाल म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तरुण दिसता येत नाही. आपल्याला अनेक आजार होत असतात. त्याचप्रमाणे अनेक केमिकल औषधांचे आपण सेवन करतो. या सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि पर्यायाने आपल्या वयावर होत असतो आणि जसजसं आपलं वय वाढत जातात तसे आपल्या सौंदर्य थोडसं कमी होऊ शकते. परंतु असे काही उपाय आहे ज्या उपायाने तुम्ही आयुष्यभर म्हणजे शंभर वर्षांपेक्षाही जास्त जगू शकता ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे ते नेहमीच तरुण दिसतात आणि जास्त काळ जिवंत असतात.
एका सर्च नुसार हार्ट अटॅकने स्त्रिया खूप खचून जातात आणि यामुळेच अनेक स्त्रियांचा मृत्यू होतो. सध्या स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परंतु तुम्ही या आजारांवर असे काही नियंत्रण केले किंवा उपाययोजना केल्या तर तुम्ही नक्की 100 वर्षापेक्षा जास्त जगू शकत. (Tips For Long Life)
या गोष्टींमुळे मृत्यूचा धोका होतो 80 टक्के कमी | Tips For Long Life
जॉन होपकिन्स येथील अनेक संशोधनधकांनी 6200 स्त्री आणि पुरुषांवर अभ्यास केला आहे. त्यात त्यांना असे आढळून आले आहे की, या चार गोष्टी आहेत ज्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. परंतु त्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या मृत्यूचा धोका जवळपास 80% कमी होते.
तंबाखू सोडून द्या
तज्ञांच्या म्हणण्यानुसार आजकाल अकाली मृत्यू होण्याला सगळ्यात आधी तंबाखू आणि धूम्रपान जबाबदार असते. ज्या महिला धुम्रपण करतात त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढलेले आहेत. तंबाखू ह्या तुमच्या हृदयाच्या धमन्या आणि फुफुसाचा नाश करते त्यामुळेच कर्करोग तसेच हृदयविकाराचा झटका यांसारख्या गोष्टी घडू शकतात.
सीक्रेट डाएट
ज्या लोकांच्या मृत्यूचा धोका कमी झाला आहे. ते मेडिटेरियन गाईडचे पालन करतात. या आहारात ताजी फळे, भाज्या आणि निरोगी तेल असते. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल असते. त्याचप्रमाणे नॉनव्हेज मध्ये ते रेड मीट ऐवजी मासे जास्त खातात.
कंबर सडपातळ ठेवणे
लठ्ठपणा हा अनेक आजारांचे मूळ कारण आहे. हृदयविकाराचा झटका कर्करोग मधुमेहाच्या रुग्णांची अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त कंबर असते तुमचा BMI 25 पेक्षा कमी आणि 18.5 पेक्षा जास्त असावा तर तुम्हाला निरोगी मानले जाते.
शरीराची हालचाल ठेवा
दिवसासाठी शरीराची हालचाल ठेवणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर बसून काम करत असेल तर दिवसातील 30 मिनिटे तरी तुमच्या क्षेत्राचे पूर्णपणे हालचाल झाली पाहिजे. यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.
गरजेपेक्षा जास्त खाऊ नका
तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करू नका. तुम्हाला भूक आहे. त्यापैकी फक्त 80% जेवण करा. जास्त अन्नग्रहण केल्याने देखील तुम्हाला अनेक गोष्टींचा त्रास होऊ शकतो त्यामुळे अगदीच पोट फुटेपर्यंत खाऊ नका.